BLOG NEW

WHAT’S NEW IN MEDICALPRO

नेत्रदोषांकडे नको डोळेझाक नाहीतर आहे अंधत्वाशी गाठ

By : on : 11/03/2019 comments : (0)

 नेत्रदोषांकडे नको डोळेझाक नाहीतर आहे अंधत्वाशी गाठ

Image result for blind man

शरीरातील सर्व अवयव ठीक-ठाक चालत असतात तेव्हा माणसाला त्या अवयवांचे महत्त्व लक्षात येत नाही. तो बिनधास्तपणे सर्व अवयवांकडून जोर देऊन काम करून घेतो. जेव्हा त्या अवयवाची सहन करण्याची व बिनातक्रार काम करण्याची क्षमता संपते तेव्हा तो अवयव कुरकुर सुरू करतो. मग तपासण्या होतात आणि एखाद्या अवयवाला गंभीर इजा झाल्याचे लक्षात येते. त्यामुळे खर्चही खूप वाढतो, असे होऊ नये म्हणून नेहमीच डॉक्टर शरीराच्या प्राथमिक तपासण्या करून घेण्याचा सल्ला देत असतात. पण आपल्याकडून त्याकडे दुर्लक्ष होते. हृदय, डोळे यासारख्या अवयवांबाबत तर खूपच खबरदारी घेणे गरजेचे असते. डोळा नाजूक असल्याने थोडंस दुर्लक्ष खूप महागात पडतं. डोळ्यांची तपासणी आपण विविध शिबिरांमध्येही करू शकता. वय झाल्यावर तर या चाचण्या केल्याच पाहिजेत.
डोळ्याविषयी सांगण्याच कारण असं की, जागतिक ग्लुकोमा संघटना आणि जागतिक ग्लुकोमा रुग्ण संघटना यांच्या वतीने 10 मार्च ते 16 मार्च हा आठवडा जागतिक ग्लुकोमा सप्ताह म्हणून पाळण्यात येत आहे. गेल्या 10 वर्षांपासून या सप्ताहाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या सप्ताहात नेत्र तपासणी शिबिरे, ग्लुकोमाबद्दल जनजागृतीसाठी व्याख्याने आयोजित केली जातात तशीच या वर्षीही जगभर असे उपक्रम राबवले जात आहेत. ग्लुकोमाच्या रुग्णांच्या सपोर्ट ग्रुपसाठीही विविध कार्यक्रम होतात. त्याचबरोबर रेडिओ, टीव्हीवरी कार्यक्रम आणि वृत्तपत्र, वेबसाइट व सर्व मुद्रित माध्यमांतून लेख लिहूनही जनजागृती केली जाते.

तुम्हाला सहाजिकच प्रश्न पडला असेल की Glaucoma
म्हणजे काय?

ग्लुकोमाला मराठीत काचबिंदू म्हणतात.
मेंदूतील दृष्टिज्ञानाचे केंद्र असलेल्या ऑप्टिक नर्व्हला क्षती पोहोचल्यामुळे होणाऱ्या डोळ्याच्या आजाराला काचबिंदू म्हणतात. त्यामुळे दृष्टी टप्प्याटप्याने कमी होते आणि ती पुन्हा सुधारता येत नाही. एखाद्या व्यक्तीला अंधत्व येण्यासाठी जी महत्त्वाची कारणं जगभरात ज्ञात आहेत त्यामध्ये काचबिंदू होणं हे दुसरं मोठं कारण आहे. साधारणपणे वयाच्या साठीच्या पुढे हा आजार होतो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी नेत्रतपासणी करून घेणे खूपच आवश्यक आहे.
काचबिंदू होण्याची दोन कारणे आहेत. डोळ्याला अतिरिक्त रक्तपुरवठा झाल्यामुळे डोळ्यातील दाब वाढतो आणि ऑप्टिक नर्व्हचे नुकसान होते किंवा (इश्चेमिया) रक्त पुरवठा कमी झाल्यानेही ऑप्टिक नर्व्हचे नुकसान होते त्यामुळे काचबिंदू होतो.
अचानक दृष्टी धूसर होणं, डोकेदुखी, डोळे असह्य दुखणं,उलट्या होणं, नजरेसमोर सप्तरंगी वर्तुळं दिसणे, दिव्यांबाजूला प्रभावळ दिसणे,मळमळणे ही लक्षणे दिसली तर काचबिंदू झालेला असू शकतो. त्यामुळे तातडीने डोळ्यांच्या डॉक्टरांना दाखवावे.

काचबिंदूचे तीन प्रकार आहेत. ओपन अँगल काचबिंदू सर्वसाधारणपणे अनेकांना होतो. डोळ्यात खूप दाब निर्माण झाला तर क्रोनिक ओपन-अँगल काचबिंदू होतो आणि त्यामुळे कोणतीही लक्षणं ध्यानात येण्याआधीच हा काचबिंदू होतो. हा काचबिंदू होण्याचं दुसरं कारण संवेदनशील ऑप्टिक नर्व्ह हे असू शकतं. नियमित नेत्र तपासणी केल्यास लवकर उपचार केले जाऊ शकतात. 30 % लोकांमध्ये नॉर्मल टेन्शन काचबिंदू आढळून येतो. अक्युट क्लोज्ड-अँगल काचबिंदू यामध्ये अचानक डोळे दुखतात. त्यामुळे डोळ्यांतील दाब वाढतो त्यातून ठरावीक काळासाठी दृष्टी जाऊ शकते. वेळीच उपचार केले नाहीत तर अंधळेपणा येऊ शकतो. सेकंडरी काचबिंदू आधीची वैद्यकीय परिस्थिती, आधी डोळ्याला झालेली इजा, आधी केलेले औषधोपचार यापैकी एखाद्या कारणामुळे सेकंडरी काचबिंदू होऊ शकतो.

काचबिंदूवर खालील उपचार केले जातात.

1. डोळ्यात घालायचं औषध:

या औषधाने डोळ्यातील इतर स्रावांचे उत्पादन कमी झाल्याने डोळ्यांवर आलेला ताण कमी होतो त्यामुळे डोळ्यांचा शुष्कपणा कमी होतो.

2. गोळ्या:

डोळ्यांत घालण्याच्या औषधाबरोबर डॉक्टर गोळ्या घेण्याचा सल्ला देऊ शकतात.

3. लेझर शस्रक्रिया:

या शस्रक्रियेमध्ये डोळ्यातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणारी यंत्रणाच बदलली जाते त्यामुळे ओलावा निर्माण करणारी द्रव्य सहजपणे डोळ्यामध्ये पसरू शकतात व शुष्कपणा कमी होतो.

4. शस्रक्रिया :

डोळ्यातील दाब (आयओपी) कमी करणे व दाब स्थिर करणे हे काचबिंदू शस्रक्रिया किंवा इतर कोणत्याही उपचाराचे ध्येय असते. शस्रक्रिया केल्यानंतर हा दाब स्थिर झाला की ऑप्टिक नर्व्हला होणारा त्रास कमी होतो.
1) ट्रॅबेक्लुलेक्टॉमी : डोळ्यातील ट्रॅबेक्युलकर मेशवर्क आणि अडजेसंट मेशवर्क बाहेर काढून डोळ्यांतील दाब स्थिर करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शस्रक्रियेला ट्रॅबेक्लुलेक्टॉमी म्हणतात.
2) काचबिंदूसाठी इम्प्लांट : डोळ्यांवर येणारा अतिरिक्त दाब कमी करण्यासाठी डोळ्यात शंट्स किंवा स्टेंट बसवले जातात. हे शंट्स किंवा स्टेंट प्लॅस्टिक,धातू किंवा कापडापासून तयार केलेले नळीच्या आकाराचे असतात. हा स्टेंट डोळ्यातील अतिरिक्त ताण कमी करून दाब स्थिर करतो.
प्रगत व अत्याधुनिक उपचार कुठे उपलब्ध आहेत?
पुणे शहरातील नामांकित नेत्रतज्ज्ञांमध्ये डॉ. आनंद पालीमकर यांच्या नावाची गणना होते. डॉ. पालीमकर यांनी नागपूर विद्यापीठातून एम. एस. ऑप्थॅल्मॉलॉजीचे शिक्षण पूर्ण केले असून, चेन्नईतील प्रतिष्ठित शंकरा नेत्रालयात (FMRF) फेलो म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
मेडिकल रेटिना (दृष्टिपटल) अर्थात, मधुमेहींसाठी लेझर उपचार (DIABETIC RETINOPATHY), उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांच्या दृष्टिपटलावरील उपचार (HYPERTINSIVE RETINOPAHTY), दृष्टिपटलासंबंधी इतर आजार आणि बिनटाक्याची मोतीबिंदू शस्रक्रिया (फॅकोइमल्सिफिकेशन ऑफ कॅटरॅक्ट), काचबिंदू या प्रकारच्या शस्रक्रियांचा डॉ. आनंद पालीमकर यांना दांडगा अनुभव असून, निर्दोषपणे या शस्रक्रिया करण्यात डॉक्टरांचे विशेष प्रावीण्य आहे.

विश्रांतवाडी आणि विमाननगरमध्ये असलेल्या डॉ. आनंद पालीमकर यांच्या ओम आय केअरमध्ये यापैकी महत्त्वाच्या प्रगत चाचण्या व शस्रक्रिया केल्या जातात.
1) डोळ्यांतील दाब तपासणे
2) तुमच्या कॉर्नियाच्या पुढच्या भागाच्या जाडीची अल्ट्रासोनिक तपासणी
3) तुमच्या डोळ्यांतील खरा दाब जाणण्यासाठी पुढच्या भागातील स्वच्छ भागाची तपासणी
4) ऑप्टिक नर्व्हची तपासणी आणि (आवश्यकतेनुसार) डिजिटल फोटोग्राफी आणि तुमच्या पेरिफेरल दृष्टिच्या तपासणीसाठी व्हिज्युअल फिल्ड टेस्टिंग
5) नर्व्ह-फायबर विश्लेषण: तुमच्या ऑप्टिक नर्व्हच्या बाजूला असलेल्या टिश्यूची जाडी मोजण्यासाठी लेझर स्कॅनिंग
6) दृष्टिपटलात असणाऱ्या नर्व्ह फायबरच्या थराची जाडी कमी होते आहे का, हे तपासता येते तसेच ऑप्टिक नर्व्हही आजार होण्याआधी तपासता येते
7) काचबिंदूचा न सुधारता येणारा परिणाम सुरुवातीच्या 5-10 वर्षांतच शोधता येतो जो इतर तपासण्यांमधून लक्षात येत नाही.
ग्लुकोमा सप्ताह जगभर पाळला जात आहे. त्यानिमित्ताने या आजाराची माहिती करून घेणे खूपच महत्त्वाचे आहे. जर तुम्ही साठीच्या पुढे आहात आणि डोळ्यांना काही त्रास होत आहे तर तुम्ही तातडीने ओम आय केअरमध्ये जाऊन आवश्यक तपासणी करू शकता. डोळ्यांच्या दुखण्याकडे डोळेझाक घालू शकते आंधळेपणाशी गाठ. हे सर्वांनीच लक्षात ठेवायला हवे. तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला असा त्रास होत असेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. ग्लुकोमा पहिल्या टप्प्यात लक्षात आला तर दृष्टी वाचवणे सोपे जाते. चला तर आपण नेत्र तपासणी करून हा सप्ताह साजरा करूया.


डॉ. आनंद पालीमकर
एम. एस. (ऑप्थॅल्मॉलॉजी) एफएमआरएफ, एफएईएच

admin

Author

view all posts

Leave a Reply

BOOKING IS EASY

ONLINE HASSLE FREE APPOINTMENT BOOKING

BOOK YOUR APPOINTMENT