ओम हार्ट अँड आय केअर क्लिनिक पुण्यातील विश्रांतवाडी आणि विमाननगर या भागांत गेल्या 11 वर्षांपासून कार्यरत आहे. हृदय आणि डोळ्यांशी संबंधित महत्त्वाच्या तपासण्या, शस्रक्रिया, वैद्यकीय सल्ला देणे या माध्यमातून आम्ही काम करत आहोत.
रुग्णांमध्ये या आजारांबद्दल जागृती व्हावी व योग्य वैद्यकीय माहिती त्यांना मिळावी या हेतूने आम्ही काल दि 23 डिसेंबर संदयाकाळी 4 वाजता हा कार्यक्रमाची सुरवात केली यात रुणांनी त्यांची काळजी कशी घ्यावी तसेच डोळ्यांचे आणि हृदयाचे आरोग्य कसे राखावे व हे आजारहोऊ नये या साठी काशी काळजी घ्यावी आणि ते झाल्यास कसे ओळखावे या संबंधी संपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले होते. हे मार्गदर्शन स्वतः हृदयरोगतज्ञ डॉ.प्रिया आनंद पालीमकर आणि नेत्रतज्ञ डॉ. आनंद सुभोध पालीमकर यांनी दिले तसेच रुग्णांसाठी सोपी योगासने कोणती व ती कशी करावी याची माहिती डॉ. सुनंदा आगाशे यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी 70 जेष्ठ नागरिक तसेच जेष्टनागरीक संघाचे अध्यक्ष श्री. दिलीप पवार ही उपस्तीत होते.